Home / News / पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळवर हल्ला

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळवर हल्ला

धाराशिव- पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर काल भूम तालुक्यातील आंदरूड गावात भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान हल्ला करण्यात आला. ग्रामदैवत...

By: E-Paper Navakal

धाराशिव- पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यावर काल भूम तालुक्यातील आंदरूड गावात भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान हल्ला करण्यात आला. ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने आयोजित या कुस्ती स्पर्धेत अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

कुस्ती सुरू असतानाच एक पैलवान धावत आला आणि त्याने थेट घायवळवर हल्ला केला. ही घटना इतकी अनपेक्षित होती की सुरुवातीचे काही क्षण नेमके काय घडले, हे प्रेक्षकांनाही लक्षात आले नाही. हल्ला करणारा पैलवान पुढे आणखी मारहाण करण्याच्या तयारीत असताना, घायवळसोबत असलेल्या काही सहकाऱ्यांनी त्याला रोखले. या प्रकारामुळे कुस्ती स्पर्धेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. धक्काबुक्की करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts