Home / News / परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार

परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार

परभणी – गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. मार्च महिन्यामध्येच नागरिकांचा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

परभणी – गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. मार्च महिन्यामध्येच नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाला होता. आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी तपमानाचा पारा आणखी वाढला आहे.

सध्या गेल्या काही भागात अवकाळी पाऊस होत असल्याने तापमानात घसरण झाली आहे़. मात्र काही भागात अजूनही तापमानाचा पारा चढताच आहे. परभणीत पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट येईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात सध्या तापमान ४० अंशाच्या वर गेले असून पुढील दोन दिवसांत जिल्ह्मात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे

Web Title:
संबंधित बातम्या