Home / देश-विदेश / बनावट बुकिंगचा फटका! OYO विरोधात थेट पोलिसात तक्रार, काय आहे प्रकरण?

बनावट बुकिंगचा फटका! OYO विरोधात थेट पोलिसात तक्रार, काय आहे प्रकरण?

FIR against OYO | ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म OYO विरोधात जयपूरमधील एका रिसॉर्टने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संसकारा रिसॉर्टला मिळालेल्या...

By: Team Navakal

FIR against OYO | ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म OYO विरोधात जयपूरमधील एका रिसॉर्टने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संसकारा रिसॉर्टला मिळालेल्या 2.66 कोटी रुपयांच्या (GST Notice) मुळे ही कारवाई करण्यात आली असून, OYO कडून “चुकीची माहिती” पुरवून बनावट बुकिंग दाखवण्यात आल्याचा आरोप रिसॉर्टने केला आहे.

एफआयआरमध्ये CEO रितेश अग्रवाल यांचाही समावेश

संसकारा रिसॉर्टशी संबंधित मदन जैन यांनी जयपूरच्या अशोक नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. एफआयआरमध्ये OYO च्या संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal), ओरावेल स्टेज् प्रायव्हेट लिमिटेड (OYO) आणि इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी षड्यंत्राचे आरोप करण्यात आले आहेत.

जैन यांच्या म्हणण्यानुसार, OYO ने 2018-19, 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांत हजारो बनावट बुकिंग्स दाखवून रिसॉर्टचा वार्षिक टर्नओव्हर फुगवून सांगितला. यामुळेच त्यांच्या नावावर2.66 कोटी रुपयांची GST नोटीस प्राप्त झाली आहे. प्रत्यक्षात 18 एप्रिल 2019 ते 20 एप्रिल 2020 या कालावधीत संस्काराने फक्त 10.95 लाख रुपयांचीच उलाढाल केली होती, असा दावा त्यांनी केला.

एफआयआरनुसार, OYO ने त्यांच्या प्रणालीत रिसॉर्टच्या नावावर 22.22 कोटी रुपयांचा व्यवसाय दाखवला. याचा आधार घेत GST विभागाने ₹2.66 कोटींचे कर आणि दंडाची नोटीस पाठवली. यामुळे, जैन यांनी यास जबाबदार OYO आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

राजस्थान हॉटेल फेडरेशनचे अध्यक्ष हुसेन खान यांनी सांगितले की, एकट्या OYO मुळे सुमारे 20 हॉटेलांना अशाच प्रकारच्या GST नोटिसा मिळाल्या आहेत. त्यांनी असा आरोपही केला की, “चार वर्षांपूर्वीही आम्ही OYO विरोधात मोहीम चालवली होती. त्यावेळी 125 हॉटेलांनी ‘OYO बुकिंग स्वीकारत नाही’ असे बोर्ड लावले होते.” OYO कडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या