Home / मनोरंजन / जहीर खान आणि सागरिका घाटगेच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, बाळाचे नाव आहे खास

जहीर खान आणि सागरिका घाटगेच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, बाळाचे नाव आहे खास

Zaheer Khan And Sagarika Ghatge Welcome Baby Boy | आयपीएल 2025 (IPL 2025) च्या धामधुमीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान...

By: Team Navakal

Zaheer Khan And Sagarika Ghatge Welcome Baby Boy | आयपीएल 2025 (IPL 2025) च्या धामधुमीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान (Zaheer Khan) आणि अभिनेत्री सागरिका घाटगे (Sagarika Ghatge) यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. सागरिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, या बाळाचं नाव “फतेहसिंह खान” (Fatehsingh Khan) असल्याचं या दाम्पत्याने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

८ वर्षांनंतर पालकत्वाची गोड अनुभूती

जहीर-सागरिका या जोडीने वर्ष 2017 मध्ये विवाह केला होता. प्रेम आणि विश्वासावर उभ्या असलेल्या या नात्याला आता एका नव्या पर्वाची सुरुवात मिळाली आहे. लग्नाच्या तब्बल 8 वर्षांनंतर त्यांना पालकत्वाचा (Parenthood) आनंद अनुभवायला मिळाला आहे.

सोशल मीडियावर गोड फोटोचा वर्षाव

सागरिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर नवजात बाळासोबतचे काही खास क्षण शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये जहीरने बाळाला मांडीवर घेतले असून सागरिका त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसताना दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये जहीर आपल्या बाळाचा छोटासा हात हातात धरून बसलेला आहे. ही छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सागरिका हिंदू असून जहीर मुस्लिम धर्मीय आहेत. तरीही या दोघांनी प्रेमाच्या आधारे एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारलं. त्यांच्या नात्याला धर्माच्या सीमा कधीच आडवं आलेलं नाही.

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

फतेहसिंहच्या आगमनाने जहीर आणि सागरिकाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीमधील सहकाऱ्यांसह चाहत्यांनीही या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या