Prithvi Shaw : पृथ्वी शॉची नवी इनिंग! IPL मध्ये संधी मिळाली नाही, मात्र या लीगने बनवले ‘आयकॉन’ खेळाडू

Prithvi Shaw

Prithvi Shaw | क्रिकेटपटू पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात होते. मात्सर,ततचा खराब फॉर्म आणि फिटनेसच्या अडचणींमुळे त्याच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. आयपीएल-2025 मध्ये त्याला कोणत्याही संघाने निवडले नाही. मात्र आता, पृथ्वी शॉ पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहे. एमुंबई टी20 लीगमध्ये (T20 Mumbai League) त्याची ‘आयकॉन प्लेअर’ (icon player) म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) 2025 साठीच्या या बहुप्रतीक्षित लीगसाठी स्टार खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे यांच्यासोबत पृथ्वी शॉचाही समावेश आहे. या लीगचा तिसरा सीझन आयपीएल संपल्यानंतर 26 मे ते 8 जून दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) रंगणार आहे.

या आयकॉन खेळाडूंच्या यादीत सरफराज खान, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांचाही समावेश आहे. सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. प्रत्येक फ्रँचायझीला एक आयकॉन खेळाडू संघात घेण्याची परवानगी असेल, ज्यामुळे संघांना अनुभवासोबत स्टार पॉवरही मिळेल.

टी20 मुंबई लीगने गेल्या हंगामांतून अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यंदा तर या लीगसाठी 2800 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली असून, आठ फ्रँचायझी यामध्ये सहभागी होणार आहेत.यामध्ये नॉर्थ मुंबई पँथर्स, एआरसीएस अंधेरी, ट्रायम्फ नाईट्स नॉर्थ ईस्ट, नमो बांद्रा ब्लास्टर्स, ईगल ठाणे स्ट्राइकर्स, आकाश टायगर्स वेस्टर्न सबर्ब्स आणि दोन नव्या संघ: सोबो मुंबई फाल्कन आणि साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सचा समावेश आहे.

एमसीए लवकरच लिलावाच्या तारखा जाहीर करणार आहे आणि त्यानंतर मुंबईच्या क्रिकेटप्रेमींना या शानदार लीगचा अनुभव घेता येईल. तसेच, या स्टार खेळाडूंना खेळताना पाहता येईल.