Maharashtra Din : मुंबईत 1 मे रोजी वाहतुकीत बदल, पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी

Maharashtra Din

Maharashtra Din | दरवर्षी 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) साजरा केला जातो. यंदा देखील राज्यभरात या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1960 मध्ये मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. याच दिवशी गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली होती. विशेष म्हणजे याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Labour Day) देखील साजरा केला जातो.

राज्यभरात कार्यक्रम, परेड आणि समारंभांचे आयोजन

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यभरात विविध सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये शासकीय परेड, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय भाषणे यांचा समावेश असतो. या वर्षीही मुंबईतील शिवाजी पार्कवर सकाळी भव्य परेडचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईत वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नविन मार्गदर्शन

मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) शिवाजी पार्क परिसरात होणाऱ्या परेडच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी विशेष नियम लागू केले आहेत. हे बदल १ मे रोजी सकाळी 6:00 ते दुपारी 12:00 या वेळेत प्रभावी राहतील.

हे रस्ते राहणार बंद

  • केळुस्कर रोड (दक्षिण आणि उत्तर) – निमंत्रितांव्यतिरिक्त सर्व वाहनांसाठी बंद
  • एस. के. बोले रोड (सिद्धिविनायक ते पोर्तुगीज चर्च) – एकेरी वाहतूक
  • स्वातंत्र्यवीर सावरकर रोड – प्रवेश मर्यादित

वाहतुकीचे पर्यायी मार्ग

  • पश्चिम उपनगरांकडे जाणारी वाहतूक: सिद्धिविनायक → एस. के. बोले रोड → पोर्तुगीज चर्च → गोखले रोड → एल. जे. रोड → राजा बडे चौक
  • दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक: पांडुरंग नाईक रोड → राजा बडे चौक → एल. जे. रोड → गोखले रोड
  • ‘नो पार्किंग’ झोन (No Parking Zones)
  • केळुस्कर रोड (उत्तर आणि दक्षिण)
  • पांडुरंग नाईक रोड
  • एन. सी. केळकर रोड (गडकरी चौक ते कोतवाल बाग)

वाहनचालकांसाठी सूचना

ज्या नागरिकांकडे अधिकृत कार पास नसेल, त्यांनी कोहिनूर पार्किंग (प्लाझा सिनेमाजवळ) आणि जे. के. सावंत रोड, दादर (पश्चिम) येथे पार्किंग करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Share:

More Posts