Jio Recharge Plan | भारतातील आघाडीची टेलिकॉन कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नवीन दीर्घकालीन वैधतेसह येणारा प्लॅन आणला आहे. या प्लॅनची किंमत केवळ 895 रुपये असून, यामध्ये 11 महिन्यांची वैधता मिळते. ज्यामुळे महिन्यांमध्ये रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.
895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतील अनेक फायदे
- सर्व लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग.
- प्रत्येक 28 दिवसांसाठी 50 एसएमएस.
- प्रत्येक 28 दिवसांसाठी 2GB हाय-स्पीड डेटा. म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा.
मात्र, लक्षात घ्या की, या प्लॅनचा लाभ फक्त काही विशिष्ट यूजर्सलाच घेता येणार आहे. ₹895 चा हा प्लॅन केवळ जिओ फोन (Jio Phone) आणि जिओ भारत फोन (Jio Bharat Phone) यूजर्ससाठीच उपलब्ध आहे. याचा अर्थ, जर तुमच्याकडे जिओ फीचर फोन असेल, तरच तुम्ही या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे, जर तुम्ही स्मार्टफोन वापरणारे सामान्य जिओ सिम कार्डधारक असाल, तर तुम्ही या फायद्यांसाठी पात्र ठरणार नाही.
जिओचे सर्व यूजर्ससाठी विविध प्लॅन्स:
जिओकडे आता सर्व प्रकारच्या यूजर्ससाठी विविध रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, ज्यात एंटरटेनमेंट प्लॅन्स , ट्रू अनलिमिटेड अपग्रेड प्लॅन्स , वार्षिक प्लॅन्स , डेटा पॅक्स, जिओ फोन आणि भारत फोन प्लॅन्स (Jio Phone and Bharat Phone Plans), व्हॅल्यू प्लॅन्स आणि ट्रू 5G अनलिमिटेड प्लॅन्स (True 5G Unlimited Plans) यांचा समावेश आहे. या प्लॅन्सची किंमत 200 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत आहे.