‘Housefull 5’ चा धमाकेदार टीझर रिलीज, तब्बल 18 बॉलिवूड स्टार्ससह ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

Housefull 5 Teaser

Housefull 5 Teaser | साजिद नाडियाडवाला यांचा ‘हाऊसफुल’ (Housefull) हा सुपरहिट चित्रपट 30 एप्रिल 2010 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, निर्मात्यांनी चाहत्यांना एक खास सरप्राइज दिले आहे. निर्मात्यांना ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5 teaser) चा बहुप्रतिक्षित टीझरनुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, यात जबरदस्त स्टारकास्ट आणि अॅक्शनसोबत कॉमेडीचा धमाका दिसून येतो.

1 मिनिटाच्या या टीझरमध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, चित्रांगदा सिंग, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, फरदीन खान, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रणजित, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर अशी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते.

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने आपल्या इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करत लिहिले, “आज 15 वर्षांपूर्वी… या मॅडनेसला सुरुवात झाली होती. भारतातील सर्वात मोठी फ्रँचायझी 5व्या भागासह परत येत आहे – आणि यावेळी केवळ गोंधळ नाही, तर ‘किलर कॉमेडी’सुद्धा!”

सोशल मीडियावरील चर्चांनुसार, या चित्रपटाचे बजेट तब्बल ₹375 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या टीझरमध्ये एकूण 18 कलाकारांची ओळख करून देण्यात आली आहे. कॉमेडीसोबत स्टार पॉवरने भरलेला ‘हाऊसफुल 5’ प्रेक्षकांसाठी विनोद आणि रहस्याने भरलेला ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘हाऊसफुल 3’ नंतर अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख पुन्हा एकत्र येत आहेत. तरुण मनसुखानी दिग्दर्शित हा चित्रपट साजिद नाडियाडवाला यांच्या ‘नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’ बॅनरखाली तयार झाला आहे. ‘हाऊसफुल’ फ्रँचायझीने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळवले असून, पाचव्या भागाकडून प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. ‘हाऊसफुल 5’ 6 जून 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share:

More Posts