Palwasha Khan : ‘बाबरी मशिदीची पहिली वीट पाक सैनिक ठेवतील’, वादग्रस्त विधान करणाऱ्या खासदार पलवाशा खान कोण आहेत?

Palwasha Mohammad Zai Khan

Palwasha Mohammad Zai Khan Remark | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (pahalgam terror attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्यातच आता एका पाकिस्तानी खासदाराचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या महिला खासदार पलवाशा मोहम्मद झाई खान (Palwasha Mohammad Zai Khan) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

अयोध्यातील नवीन बाबरी मशिदीची पहिली वीट त्यांच्या देशाच्या सशस्त्र दलाचे जवान ठेवतील, असे या वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (PPP) खासदार पलवाशा खान यांनी केले आहे.

पलवशा म्हणाल्या, “बाबरी मशिदीच्या पुनर्निर्माणाची पहिली वीट पाकिस्तानी सैन्याचे जवान ठेवतील आणि पहिली अजान पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर देतील.” या विधानामुळे भारत-पाक संबंधांमध्ये आधीपासून असलेल्या तणावात आणखी भर पडली आहे.

पलवाशा पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या पंजाबमधील खासदार आहेत. अलीकडेच पलवाशा यांच्या पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताच्या विरोधात भडकाऊ विधान केले होते.

पाकिस्तानच्या उच्च सभागृहात बोलताना त्या म्हणाल्या, “अयोध्यातील नवीन बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तान आर्मीचे सैनिक ठेवतील आणि पहिली अजान स्वतः आर्मी चीफ आसिम मुनीर देतील.” त्यांनी असाही दावा केला की, सैन्यातील शीख लोक पाकिस्तानवर हल्ला करणार नाहीत, कारण ते त्यांच्यासाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. त्या म्हणाल्या, “जर ते पाकिस्तानला धमक्या देत असतील, तर त्यांना कळू द्या की शीख सैन्य पाकिस्तानवर हल्ला करणार नाही, कारण ही त्यांच्यासाठी गुरु नानक यांची भूमी आहे.”

पलवाशा मोहम्मद झाई खान कोण आहेत? (Who is Palwasha Mohammad Zai Khan?)

पलवाशा मोहम्मद झाई खान या सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उप-माहिती सचिव आणि पाकिस्तानी खासदार आहेत. त्या मार्च 2021 पासून उच्च सभागृहाच्या सदस्या आहेत. त्या सिंध प्रांताचे प्रतिनिधित्व महिलांसाठी राखीव जागेवर करतात. त्यांनी 2008 ते 2013 पर्यंत पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्या म्हणूनही काम केले आहे. पलवाशा खान या राजकारणी आणि व्यावसायिक फोजिया बेहराम यांच्या भाची आहेत.

Share:

More Posts