Amul Milk Price Hike | देशातील सर्वात मोठी डेअरी प्रोडक्ट कंपनी अमूलने (Amul Milk Price Hike) त्यांच्या विविध प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ आजपासून (1 मे 2025) लागू झाली आहे. अमूल स्टँडर्ड, अमूल बफेलो मिल्क, अमूल गोल्ड, अमूल स्लिम एन ट्रिम, अमूल चाय मजा, अमूल ताजा आणि अमूल काऊ मिल्क या सर्व प्रकारच्या दुधाच्या किमती वाढल्या आहेत.
यापूर्वी मदर डेअरीने (Mother Dairy) देखील 30 एप्रिलपासून त्यांच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
या दरवाढीमुळे आजपासून अमूलचे दूध प्रतिलिटर 2 रुपयांनी महाग होणार आहे. भारतातील बाजारपेठेत आता विविध प्रकारच्या दुधाच्या किमती त्यानुसार बदलल्या जातील. दुग्धोत्पादन क्षेत्रात वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे, ज्याचा परिणाम दूध उत्पादक आणि कंपन्यांवर होत आहे.
Amul increases milk prices by Rs 2 per litre from Thursday (May 1, 2025) in markets across the country pic.twitter.com/kC20LEhlv2
— IANS (@ians_india) April 30, 2025
मदर डेअरीच्या दुधाच्या किमती:
या आठवड्याच्या सुरुवातीला मदर डेअरीने फुल क्रीम, टोन्ड, डबल-टोन्ड आणि गायीच्या दुधासह सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला थोडा भार सोसावा लागणार आहे.