Home / मनोरंजन / ‘House Arrest’ शो वादात, उल्लू अ‍ॅपवरून हटवण्यात आला; एजाज खानसह निर्मात्यावर गुन्हा दाखल

‘House Arrest’ शो वादात, उल्लू अ‍ॅपवरून हटवण्यात आला; एजाज खानसह निर्मात्यावर गुन्हा दाखल

House Arrest Controversy | अभिनेता एजाज खानचा (Ajaz Khan) ‘हाऊस अरेस्ट’ (House Arrest Controversy ) या रिॲलिटी शोमध्ये आक्षेपार्ह दृश्यामुळे...

By: Team Navakal
House Arrest Controversy
Social + WhatsApp CTA

House Arrest Controversy | अभिनेता एजाज खानचा (Ajaz Khan) ‘हाऊस अरेस्ट’ (House Arrest Controversy ) या रिॲलिटी शोमध्ये आक्षेपार्ह दृश्यामुळे वादात अडकला आहे. या प्रकरणात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, हाऊस अरेस्ट’ शो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म उल्लू ॲपवरून (Ullu App) हटवण्यात आला आहे.

या शोमधील एका व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. राजकीय नेते व इतरांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये खान महिला स्पर्धकांवर कॅमेऱ्यासमोर अश्लील कृत्य करण्यास सांगताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अभिनेता एजाज खान, निर्माता राजकुमार पांडे आणि इतरांविरुद्ध त्यांच्या वेब शो ‘हाऊस अरेस्ट’मधील कथित अश्लील गोष्टींसाठी तक्रार दाखल केली आहे

अंबोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बजरंग दलाचे कार्यकर्ते गौतम रव्रिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, वेब शोमध्ये अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता आणि शोमध्ये सादर केलेल्या कृत्यांनी महिलांचा अपमान केला गेला आहे.

तक्रारदाराने नमूद केले की, त्यांना शोमधील अश्लील गोष्टींबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आणि अनेक लोकांनी वैयक्तिक संदेश पाठवून याबाबत तक्रार केली, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) याची स्वतःहून दखल घेते उल्लूचे सीईओ विभू अगरवाल आणि खान यांना समन्स बजावले आहे.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या ‘एक्स’वर शोमधील एक क्लिप शेअर केली आणि अशा “अश्लील सामग्री” तयार करणाऱ्या ॲप्सवर बंदी का घातली जात नाही, असा सवाल केला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही शोवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या