Vi चा 180 दिवसांसाठीचा खास प्लॅन! रोज 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, OTT सब्सक्रिप्शन, पाहा किंमत

Vodafone Idea New Recharge Plan

Vodafone Idea New Recharge Plan | टेलिकॉम कंपनीने व्होडाफोन आयडियाने (Vi) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आकर्षक प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

विशेष म्हणजे, हा प्लॅन अनेक लोकप्रिय OTT ॲप्सच्या सब्सक्रिप्शनसह येतो. या प्लॅनच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया.

Vodafone Idea 2,399 रुपयांचा रिचार्ज प्लॅनच

व्होडाफोन आयडियाच्या या नवीन प्लॅनची किंमत 2,399 रुपये आहे. एकदा रिचार्ज केल्यावर ग्राहक 180 दिवसांपर्यंत कॉलिंग, डेटा आणि एसएमएसच्या फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो.

OTT सबस्क्रिप्शन मोफत

या प्लॅनमधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना अनेक OTT प्लॅटफॉर्म्सची सदस्यता मिळते. यामध्ये Mobile TV ॲक्सेससोबत ZEE5, SonyLIV, Lionsgate Play, Playflix, Fancode, Aaj Tak आणि Manoramax यांसारख्या ॲप्सचा समावेश आहे.

कंपनीने या नवीन प्लॅनमध्ये बिंज-ऑल नाईट आणि वीकेंड डेटा रोलओवरसारखे अतिरिक्त फायदे देखील दिले आहेत. यासोबतच डेटा डिलाईटचा लाभही ग्राहकांना मिळणार आहे. तसेच, मुंबई, पटना आणि चंदीगडमधील युजर्सना आता अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ मिळणार आहे.