Maharashtra HSC Result 2025 | आज बारावीचा निकाल! कधी व कोणत्या वेबसाइट्सवर पाहता येईल रिझल्ट? जाणून घ्या

Maharashtra HSC Result 2025

Maharashtra HSC Result 2025 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १२वीचा निकाल (HSC result 2025) आज 5 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. रविवारी मंडळाने अधिकृतरित्या ही घोषणा केली. निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स:

  • mahahsscboard.in
  • hscresult.mkcl.org
  • results.digilocker.gov.in
  • results.targetpublications.org
  • results.navneet.com

कनिष्ठ महाविद्यालयांना mahahsscboard.in या संकेतस्थळावर त्यांच्या कॉलेज लॉग-इनद्वारे एकत्रित निकाल पाहता येईल.

यंदा निकाल वेळेआधी

यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर केला जात आहे, ही महाराष्ट्र बोर्डाच्या इतिहासात पहिली वेळ आहे. यामागे मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षांसाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी HSC परीक्षा यंदा लवकर घेतल्या गेल्या होत्या.

पारंपरिक पद्धतीनुसार परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतात, परंतु यंदा त्या 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होऊन 11 मार्च 2025 पर्यंत पार पडल्या. लवकर निकाल लागल्यामुळे 2025-26 शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

यावर्षी HSC परीक्षेसाठी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा एकूण 9 विभागांमध्ये – मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, कोकण – पार पडल्या. गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

ऑनलाइन निकाल पाहण्याची पद्धत:

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या – mahresult.nic.in
  • “HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा
  • आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका
  • “Submit” वर क्लिक करा
  • निकाल स्क्रीनवर दिसेल – त्याची PDF डाउनलोड करा

SMS द्वारे निकाल:

MHSSC असे टाईप करा आणि 57766 या क्रमांकावर SMS पाठवा.