Home / देश-विदेश / सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक पाऊल: न्यायाधीशांची संपत्ती आता सर्वांसमोर, सरन्यायाधीशांकडे किती मालमत्ता आहे?

सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक पाऊल: न्यायाधीशांची संपत्ती आता सर्वांसमोर, सरन्यायाधीशांकडे किती मालमत्ता आहे?

Supreme Court Judges Assets Disclosure | भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक ऐतिहासिक निर्णय घेत पारदर्शकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले...

By: Team Navakal
Supreme Court Judges Assets Disclosure

Supreme Court Judges Assets Disclosure | भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक ऐतिहासिक निर्णय घेत पारदर्शकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर सध्या कार्यरत न्यायाधीशांची संपत्तीची घोषणा सार्वजनिक करण्यात आली आहे. आहे. या घोषणेमध्ये त्यांच्या जोडीदारांशी व संयुक्त कुटुंबीयांशी संबंधित स्थावर-जंगम मालमत्ता, सोने, शेअर्स व गुंतवणूक (Investments) यांचा समावेश आहे.

सध्या 33 पैकी 21 न्यायाधीशांची मालमत्ता माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, उर्वरित न्यायाधीशांची माहिती लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये कॉलेजियममधील पाच न्यायाधीशांचाही समावेश आहे.

या निर्णयामागील पार्श्वभूमी पाहता, 1 एप्रिल रोजी झालेल्या न्यायालयाच्या ठरावानुसार ही माहिती सर्वसामान्यांसाठी उघड करण्यात आली. यापुढील काळात नेमले जाणारे सर्व न्यायाधीशही ह्या प्रक्रियेत समाविष्ट असतील.

हा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi High Court) न्यायमूर्ती यशवंत वर्मा (Yashwant Varma) यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीमुळे जळालेल्या नोटांच्या कथित प्रकरणामुळे निर्माण झालेल्या न्यायव्यवस्थेतील अपारदर्शकतेच्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे. यापूर्वी सरन्यायाधीशांसाठी मालमत्तेची घोषणा अनिवार्य होती, पण इतर न्यायाधीशांसाठी ती ऐच्छिक होती.

याव्यतिरिक्त, नोव्हेंबर 2022 ते मे 2025 या कालावधीत सर्वोच्च व उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांची माहितीही वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात राज्य व केंद्र सरकारच्या शिफारशी, कॉलेजियमचे निर्णय आणि निवड प्रक्रियेची पारदर्शक माहिती समाविष्ट आहे.

सरन्यायाधीश संजीव खन्ना (CJI Sanjeev Khanna) यांच्याकडे किती संपत्ती आहे?

सरन्यायाधीश खन्ना यांच्या नावावर बँकेत ₹55.75 लाख मुदत ठेव व ₹1.06 कोटी PPF खात्यात आहे. मालमत्तेमध्ये दक्षिण दिल्लीतील 2 BHK डीडीए फ्लॅट आणि कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील 4 BHK फ्लॅटचा समावेश आहे. याशिवाय गुरगावमध्ये (Gurgaon) एका फ्लॅटमध्ये त्यांच्या मुलीसह 56% हिस्सेदारी आहे. तसेच, हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) पिढीजात जमीनही त्यांच्या नावावर आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या