NAAC मूल्यांकनात मोठे फेरबदल! महाविद्यालयांसाठी आता ऑनलाइन तपासणी, नवे नियम जारी

NAAC Accreditation New Rules

NAAC Accreditation New Rules | राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेतील (National Assessment and Accreditation Council – NAAC) भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आणि सीबीआयच्या अटकेनंतर, संस्थेने मूल्यांकन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. कॉलेजांसाठी ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइनअसेल, तर विद्यापीठांसाठी संकरित (hybrid) स्वरूपात केली जाईल.

नवीन धोरणानुसार, कॉलेजांना मूल्यांकन पथकाची माहिती फक्त तपासणीच्या दिवशीच मिळेल, तर विद्यापीठांना केवळ दोन दिवस आधी सांगण्यात येईल.

महत्त्वाची बाब म्हणजे, कॉलेजांनी GPS किंवा लोकेशन-सक्षमकॅमेऱ्यांसह थेट व्हिडिओ फुटेजसाठी सुविधा ठेवावी लागेल. ही संपूर्ण तपासणी व्हर्चुअल स्वरूपात असेल.

SOP अंतर्गत नवे बदल:

NAAC ने नव्याने प्रकाशित केलेल्या मानक संचालन प्रक्रियेने (SOP) मूल्यांकांची संख्या कमी केली आहे. आतापर्यंत तपासणी पथकात 3 ते 7 सदस्य असत; आता प्रत्यक्ष भेटीसाठी फक्त 2 सदस्य उपस्थित राहतील.

3 फेब्रुवारी 2025 रोजी CB Iने 10 जणांना अटक केली, जे एका खाजगी आंध्रप्रदेशातील अभिमत विद्यापीठाकडून लाच घेत होते. यानंतर NAAC ने 900 हून अधिक मूल्यांकक निलंबित केले आणि एक वर्षाचे निकालही रद्द केले.

10 फेब्रुवारी 2025 रोजी NAACने मूलभूत मान्यता सुरू करण्याची घोषणा केली. पुढील टप्प्यात ‘परिपक्वता आधारित श्रेणीबद्ध पद्धत’ (Maturity-Based Graded Levels) लागू होईल. यासाठी 23 एप्रिल रोजी एक सविस्तर SOP प्रकाशित करण्यात आला.

कॉलेजांसाठी ऑनलाइन मूल्यांकन – प्रमुख नियम:

  • 2 दिवसांचे मूल्यांकन, सुरूवातीच्या 5 मिनिटे आधी मीटिंग लिंक दिली जाईल .
  • संपूर्ण व्हर्चुअल भेटीदरम्यान दोन्ही बाजूंनी कॅमेरे सतत सुरू असावेत.
  • फक्त अधिकृत तपासणी पथकाशी संवाद, इतर कोणाशीही संपर्क नाही.
  • सांस्कृतिक कार्यक्रम टाळावेत, मात्र विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहतील.
  • भेटीच्या अखेरीस ड्राफ्ट रिपोर्ट ईमेलद्वारे दिली जाईल, त्यावर 15 मिनिटांची बैठक होईल.

विद्यापीठांसाठी संकरित तपासणी – महत्त्वाचे निर्देश:

  • औपचारिक स्वागत, शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू टाळण्याचा सक्त इशारा.
  • उल्लंघन झाल्यास मान्यता प्रक्रिया रद्द केली जाईल, आणि मूल्यांककांचे NAAC डेटाबेसमधून वगळण्यात येईल.
  • प्रत्यक्ष भेटीसाठी येणाऱ्या 2 सदस्यांचा प्रवास व निवास NAAC मार्फत करण्यात येईल.