Ranveer Allahbadia | लोकप्रिय पॉडकास्टर आणि यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर रणवीरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तो शेजारील देशातील नागरिकांची माफी मागताना दिसत आहे.
त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की त्याच्या या पोस्टमुळे भारतातील लोक नाराज होऊ शकतात. मात्र, त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडिया युजर्स चांगलेच भडकले. सोशल मीडियावरून टीका झाल्यानंतर अखेर त्याने ही पोस्ट केली.
रणवीर अलाहाबादियाची पाकिस्तानी नागरिकांसाठी पोस्ट व्हायरल
रणवीर अलाहाबादियाने १० मे रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक स्लाइड्ससह एक पोस्ट शेअर केली. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले – ‘प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, मला या पोस्टसाठी अनेक भारतीयांकडून टीका सहन करावी लागेल. पण हे सांगणे महत्त्वाचे आहे. अनेक भारतीयांप्रमाणे माझ्या मनातही तुमच्यासाठी द्वेष नाही. आपल्यापैकी अनेकजण शांतता इच्छितात. जेव्हाही आम्ही पाकिस्तानींना भेटतो, तेव्हा तुम्ही नेहमीच आमचे प्रेमाने स्वागत करता. पण तुमचा देश सरकार चालवत नाही. तो तुमची सेना आणि तुमची गुप्तचर संस्था (ISI) चालवते. सरासरी पाकिस्तानी या दोन्ही गोष्टींपेक्षा खूप वेगळे आहेत. पाकिस्तानीच्या मनात शांतता आणि समृद्धीची स्वप्ने आहेत. या दोन खलनायकांनी स्वातंत्र्यानंतर तुमच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे.’
रणवीर अलाहाबादियाने पाकिस्तान्यांना दिला पुरावा
रणवीरने पुढे लिहिले की – ‘पुरावा १ – गेल्या काही वर्षांत पकडले गेलेले सर्व दहशतवादी मूळचे पाकिस्तानचे आहेत. पुरावा २ – तुमचे लष्करी नेते जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाच्या भावाच्या हाफिज अब्दुल रौफच्या शासकीय अंत्यसंस्कारात सामील झाले होते. पुरावा ३ – तुमच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच स्काय न्यूजवर राज्य प्रायोजित दहशतवाद स्वीकारला, पण मला तुमची काळजी आहे, त्यांची नाही.’
रणवीरने पाकिस्तानी जनतेची माफी मागितली
रणवीर पुढे म्हणाला, ‘जर तुम्हाला असे वाटत असेल की आम्ही द्वेष पसरवत आहोत, तर मी मनापासून माफी मागतो. पाकिस्तान्यांना भेटणारे भारतीय तुमचे बोलणे समजून घेतात, पण भारतीय आणि पाकिस्तानी मीडिया दोन्हीही सध्या खोटे बोलत आहेत. आपली बहुतेक लोकसंख्या सीमेजवळच्या निष्पापांसाठी शांतता इच्छिते, पण भारताला पाक सेना आणि आयएसआयचा राज्य पुरस्कृत दहशतवाद संपवायचा आहे.’
ट्रोल झाल्यावर डिलीट केली पोस्ट
रणवीरने लिहिले – ‘एक शेवटची गोष्ट… हे भारतीय विरुद्ध पाकिस्तानी लोकांबाबत नाही, हे भारत विरुद्ध पाकिस्तानी सेना आणि आयएसआय आहे. आशा आहे की दीर्घकाळ शांतता राहील.’ मात्र, कमेंट सेक्शनमध्ये ट्रोल झाल्यानंतर काही तासांत त्याने पोस्ट डिलीट केली. त्यानंतर त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने स्पष्टीकरण दिले.
रणवीर अलाहाबादियाने स्पष्टीकरण देत व्हिडिओ शेअर केला, त्यात तो म्हणाला की, ‘जय हिंद जय भारत मित्रांनो, भारतीय सेनेला सर्वात आधी १०० टक्के सपोर्ट, १०० टक्के प्रेम, १०० टक्के सन्मान. गेल्या ५ वर्षांत आम्ही ५० हून अधिक मिलिटरी थीम पॉडकास्ट बनवले, भारतीय सैन्यासाठी. आम्हाला हे समजले आहे की हार्ड पॉवर सेनेच्या हातात असते, सरकारच्या हातात असते. भारतीय नागरिक म्हणून तुमच्या हातात सॉफ्ट पॉवर असते. जे मीडियाच्या हातातही आहे. सोशल मीडिया नॅरेटिव्ह्स, मीडिया नॅरेटिव्ह्स हे तुम्ही इफेक्ट करू शकता. संघर्ष होत होत आहे, त्याबद्दल बोला. बरेच पाकिस्तानी पुरावे मागत आहेत की तुम्हाला कसे कळले की पाकिस्तान पहलगाम अटॅक मध्ये सामील होता. तर पुरावा हा आहे की त्यांचे ख्वाजा आसिफ हे डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांनी स्काय न्यूजमध्ये येऊन स्वतः म्हटले आहे की हो आम्ही लोक हे ३० वर्षांपासून करत आहोत.’