Rohit Sharma Stand Inauguration | मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील (Wankhede Stadium) स्टँड आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाने ओळखले जाणार आहे. जाणाऱ्या खास स्टँडमुळे अधिक खास बनले आहे. शुक्रवारी (दि. 16) या स्टँडचे शानदार उद्घाटन पार पडले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि रोहित शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत होता.
या सोहळ्याला भारतीय क्रिकेट मंडळाचे (BCCI) अधिकारी, माजी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या रोहित शर्माच्या योगदानाचा गौरव म्हणून एमसीएने हा निर्णय घेतला होता. वानखेडे स्टेडियमच्या तिसऱ्या मजल्यावरील स्टँडला आता ‘रोहित शर्मा स्टँड’ असे नाव देण्यात आले आहे.
#WATCH | Mumbai | At the inauguration ceremony of a stand in Wankhede to be named after him, Indian ODI men's cricket team captain Rohit Sharma says, "What is going to happen today, I have never dreamed of. As a kid growing up, I wanted to play for Mumbai, for India. No one… pic.twitter.com/BH2VCjmxFi
— ANI (@ANI) May 16, 2025
उद्घाटनप्रसंगी रोहित शर्मा भावुक झाला होता. यावेळी बोलताना तो म्हणाला, “माझ्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात याच मैदानावर झाली आणि आज माझ्या नावाचा स्टँड इथे असणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ही बाब मी कायम मनात जपून ठेवीन.” त्याने एमसीए आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले. पत्नी रितिकाही (Ritika) या खास क्षणी उपस्थित होती आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
या सोहळ्यात भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर (Ajit Wadekar) आणि माजी एमसीए अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाच्या स्टँड्सचेही उद्घाटन झाले. वाडेकर यांनी 1971 मध्ये भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकून दिली, तर पवार यांनी एमसीए आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असताना क्रिकेटच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासोबतच, माजी एमसीए अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांच्या स्मरणार्थ एमसीए ऑफिस लाऊंजचेही उद्घाटन करण्यात आले.
A boy from Borivali is having a stand named after him at Wankhede.. 𝗧𝗢𝗗𝗔𝗬 💙#PlayLikeMumbai #MumbaiIndians pic.twitter.com/mrXtJESViu
— Mumbai Indians (@mipaltan) May 16, 2025
एमसीएने एप्रिल 2025 मध्ये झालेल्या 86व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “या तिन्ही दिग्गजांनी मुंबई आणि भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर पोहोचवले. त्यांच्या योगदानाचा हा सन्मान आहे.”
आता 21 मे 2025 रोजी रोहित शर्मा याच वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) खेळणार आहे, जिथे चाहते त्याच्या नावाच्या स्टँडचा आनंद घेतील.
रोहितची विक्रमी कामगिरी:
रोहित शर्माने 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19,700 धावा आणि 49 शतके केली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच, मुंबई इंडियन्सने त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.