‘हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे मोठा गुन्हा’: राहुल गांधींचा जयशंकर यांच्यावर आरोप

Rahul Gandhi on S. Jaishankar

Rahul Gandhi on S. Jaishankar | भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सध्या काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर (Operation Sindoor) पाकिस्तान पूर्णतः बचावात्मक भूमिकेत गेला असून, देशभरात या कारवाईबद्दल समाधानाची भावना आहे. मात्र, यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्यावर थेट टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधींचा थेट सवाल:

राहुल गांधींनी शनिवारी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, “हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला पूर्वसूचना देणे हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. परराष्ट्र मंत्री स्वतः हे मान्य करत आहेत. मग याला परवानगी कोणी दिली? याचे देशाला काय परिणाम भोगावे लागले? आपल्याला किती विमाने गमावावी लागली?” यासोबतच, त्यांनी जयशंकर यांचा एका व्हिडि देखील शेअर केला.

राहुल गांधींच्या या विधानाला एस. जयशंकर यांच्या पत्रकार परिषदेमधील वक्तव्याची पार्श्वभूमी होती. जयशंकर म्हणाले होते की, “ऑपरेशन सुरू होताना आम्ही पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला होता की आमचे लक्ष्य दहशतवादी केंद्रे आहेत, पाकिस्तानी सैन्य नव्हे. त्यांना हस्तक्षेप न करण्याचा पर्याय दिला होता, पण त्यांनी नकार दिला.”

त्यांच्या माहितीनुसार, ७ मे रोजी रात्री 1:00 ते 1:30 दरम्यान भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांना कॉल करून ही माहिती दिली होती. यामध्ये केवळ दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला असल्याचे आणि सैन्याला इजा न करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. संवादासाठी भारत तयार असल्याचेही त्यात नमूद केले गेले.

परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका स्पष्ट:

राहुल गांधी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) म्हटले की, “परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की पाकिस्तानला माहिती ऑपरेशन सुरू झाल्यानंतर देण्यात आली होती. त्याआधी नाही. या विधानाची चुकीची मांडणी केली जात आहे, आणि हे तथ्य विकृत केल्यासारखे आहे.”

भारतीय हवाई दलाने विमान गमावले का?

11 मे रोजी आयोजित लष्करी पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) कोणतेही विमान गमावले आहे का, असा सवाल उपस्थित झाला. यावर एअर मार्शल ए.के. भारती (Air Marshal A.K. Bharti) यांनी परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मात्र लेफ्टनंट जनरल घई यांनी सांगितले, “कोणत्याही युद्धजन्य कारवाईत काही नुकसान होत असते. मात्र, आमची सर्व रणनीतिक उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत आणि आमचे सर्व पायलट सुरक्षित परतले.”

Share:

More Posts