All-Party Delegation | दहशतवादाविरोधातील भारताच्या ठाम आणि एकसंध भूमिकेची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी मांडणी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा पाऊल उचलले आहे. याच महिन्याच्या अखेरीस भारतातून सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे (all-party delegations) विविध प्रमुख देशांना भेट देणार आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी या शिष्टमंडळांबाबत माहिती दिली असून, सदस्यांची संपूर्ण यादी आणि त्यांच्या दौऱ्यातील देशांची नावे स्पष्ट करण्यात आली आहेत.
शिष्टमंडळांचा उद्देश काय?
संसदीय कामकाज मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही शिष्टमंडळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इतर मित्र राष्ट्रांना भेट देतील. त्यामध्ये भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत घेतलेल्या कारवायांची माहिती दिली जाईल आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताचा ‘शून्य सहनशीलतेचा’ (zero-tolerance) संदेश प्रभावीपणे मांडला जाईल.
‘ऑपरेशन सिंदूर’ 7 मे रोजी पार पडले असून, यात पाहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील हल्ल्याचा बदला घेण्यात आला होता. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी गटांचे तळ उद्ध्वस्त केले गेले. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्याशी संबंधित 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
कोण आहेत शिष्टमंडळांतील सदस्य?
या सात शिष्टमंडळांमध्ये एकूण 51 राजकीय नेते आहेत. प्रत्येक गटात 8-9 सदस्य असून त्यांचं नेतृत्व विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांकडे देण्यात आलं आहे. यामध्ये 31 सदस्य एनडीएचे (NDA) असून 20 सदस्य हे इतर पक्षांचे आहेत.
शिष्टमंडळ 1: या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजप नेते बैजयंत पांडा करतील. हे शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जीरिया या देशांना भेट देईल. सदस्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- भाजप खासदार बैजयंत पांडा (नेते)
- भाजप खासदार निशिकांत दुबे
- भाजप खासदार फांगनॉन कोन्याक
- भाजप खासदार रेखा शर्मा
- AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी
- सतनाम सिंह संधू
- गुलाम नबी आझाद
- राजदूत हर्ष श्रृंगला
शिष्टमंडळ 2: या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजप नेते रवी शंकर प्रसाद करतील. हे शिष्टमंडळ यूके, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन (EU), इटली आणि डेन्मार्क या देशांना भेट देईल. सदस्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- भाजप खासदार रवी शंकर प्रसाद (नेते)
- भाजप खासदार डॉ. दग्गुबाती पुरंदेश्वरी
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी
- गुलाम अली खटाना
- काँग्रेस खासदार अमर सिंह
- भाजप खासदार समिक भट्टाचार्य
- एमजे अकबर
- राजदूत पंकज सरन
शिष्टमंडळ 3: या शिष्टमंडळाचे नेतृत्व जेडीयूचे खासदार संजय कुमार झा करतील. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर या देशांना भेट देईल. सदस्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- जेडीयू खासदार संजय कुमार झा (नेते)
- भाजप खासदार अपराजिता सारंगी
- एआयटीसी खासदार युसूफ पठाण
- भाजप खासदार ब्रिज लाल
- सीपीआय (एम) खासदार डॉ. जॉन ब्रिटास
- भाजप खासदार प्रधान बरुआ
- भाजप खासदार हेमंग जोशी
- काँग्रेस नेते सलमान खुर्शीद
- राजदूत मोहन कुमार
शिष्टमंडळ ४: या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेनेचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे करतील. हे शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती, लायबेरिया, काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि सिएरा लिओन या देशांना भेट देईल. सदस्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- शिवसेना खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे (नेते)
- भाजप खासदार बांसुरी स्वराज
- आययूएमएल खासदार ईटी मोहम्मद बशीर
- भाजप खासदार अतुल गर्ग
- बीजेडी खासदार सस्मित पात्रा
- भाजप खासदार मनन कुमार मिश्रा
- एस एस अहलुवालिया
- राजदूत सुजन चिनॉय
शिष्टमंडळ ५: या शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते शशी थरूर करतील. हे शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबिया या देशांना भेट देईल. सदस्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- काँग्रेस खासदार शशी थरूर (नेते)
- एलजेपी (रामविलास) खासदार शांभवी
- जेएमएम खासदार सरफराज अहमद
- टीडीपी खासदार जीएम हरीश बालायोगी
- भाजप खासदार शशांक मणी त्रिपाठी
- भाजप खासदार भुवनेश्वर कलिता
- शिवसेना खासदार मिलिंद मुरली देवरा
- राजदूत तरणजित सिंह संधू
- भाजप खासदार तेजस्वी सूर्या
शिष्टमंडळ ६: या शिष्टमंडळाचे नेतृत्व द्राविड मुनेत्र कळघमच्या खासदार कनिमोझी करुणानिधी करतील. हे शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटव्हिया आणि रशिया या देशांना भेट देईल. सदस्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- डीएमके खासदार कनिमोझी करुणानिधी (नेत्या)
- सपा खासदार राजीव राय
- एनसी खासदार मियान अल्ताफ अहमद
- भाजप खासदार ब्रिजेश चौटा
- आरजेडी खासदार श्री प्रेम चंद गुप्ता
- आप खासदार अशोक कुमार मित्तल
- राजदूत मंजीव एस. पुरी
- राजदूत जावेद अश्रफ
शिष्टमंडळ ७: या शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे करतील. हे शिष्टमंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना भेट देईल. सदस्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे (नेत्या)
- भाजप खासदार राजीव प्रताप रुडी
- आप खासदार विक्रमजीत सिंह साहनी
- काँग्रेस खासदार मनीष तिवारी
- भाजप खासदार अनुराग सिंह ठाकूर
- टीडीपी खासदार लावू श्री कृष्ण देवरायालू
- आनंद शर्मा
- मुरलीधरन
- राजदूत सय्यद अकबरुद्दीन