COVID-19 New Cases In India | भारतात मागील काही दिवसांत कोरोना विषाणूच्या (COVID-19) रुग्णांमध्ये सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 मेपासून कोविड रुग्णांच्या आकडेवारीत सुधारणा केली आहे, जी आता अधिक अचूकपणे डॅशबोर्डवर (dashboard) उपलब्ध आहे.
घटलेली प्रतिकारशक्ती आणि आणि विषाणूमधील बदल ही नवीन रुग्ण वाढण्यामागे दोन प्रमुख कारणं सांगितली जात आहे.. ही परिस्थिती विशेषतः दक्षिण भारतातील तीन राज्यांत अधिक जाणवत आहे – केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यात रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सध्या देशात 257 सक्रिय कोव्हिड रुग्ण आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचं आवाहन केलं असून, भारतातील एकंदर स्थिती “नियंत्रणात आहे”. मागील एका आठवड्यात महाराष्ट्रात नवीन 44 रुग्ण आढळून आले आहेत.
कोविड-19 संदर्भात 5 महत्त्वाचे मुद्दे:
नवीन प्रकार अधिक धोकादायक नाही: अधिकाऱ्यांच्या मते, आतापर्यंत या नव्या प्रकारामुळे कोणताही गंभीर धोका दिसून आलेला नाही. मात्र 2020-21 मधील महामारीचा अनुभव लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाय घेणं अत्यावश्यक आहे.
JN.1 प्रकाराची वाढ: ऑगस्ट 2023 मध्ये ओमिक्रॉनच्या BA.2.86 व्हेरिएंटमधून निर्माण झालेला JN.1 प्रकार पहिल्यांदा आढळला होता. WHO (World Health Organisation) ने डिसेंबर 2023 मध्ये त्याला ‘variant of interest’ म्हणून घोषित केलं. या प्रकारात सुमारे 30 उत्परिवर्तन असून LF.7 आणि NB.1.8 ही नावं सध्या चर्चेत आहेत.
दक्षिणपूर्व आशियातून आलेला धोका: हॉंगकॉंग (Hong Kong), सिंगापूर (Singapore) आणि थायलंड (Thailand) येथे कोविडच्या नव्या लाटेचा फटका बसलेला आहे. एकट्या सिंगापूरमध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात 14,000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले. हेच प्रकार भारतातही पोहोचल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भारतात संभाव्य धोका: दक्षिणपूर्व आशियातील अलीकडील वाढीचं कारण म्हणजे लोकांमधील अँटीबॉडीजची कमतरता. भारतातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतामध्येही तशीच शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्येत सौम्य वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांंनी काळजी घेण्याची गरज आहे.