Home / महाराष्ट्र / छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री! मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर म्हणाले…

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री! मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर म्हणाले…

Chhagan Bhujbal in Maharashtra Cabinet | राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची...

By: Team Navakal
Chhagan Bhujbal in Maharashtra Cabinet

Chhagan Bhujbal in Maharashtra Cabinet | राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेत आल्यावर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते आणि त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांनी मंत्रिमंडळात डावलल्याने भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस यांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. अखेर त्यांच्या संयमाचे फळ त्यांना मिळाले आहे, असे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते भुजबळ यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही भुजबळ यांनी हे खाते सांभाळले आहे.

भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे अजित पवार गटातील नाराजीनाट्यावर पडदा पडला आहे. यामुळे अजित पवार गटात उत्साहाचे वातावरण आहे.

सात दिवसांपूर्वीच झाला निर्णय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सात दिवसांपूर्वीच भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय घेतला होता, असे सांगितले जात आहे. याबाबत भुजबळ यांना एका ओळीचा संदेश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीची एक जागा रिक्त होती आणि त्या जागेवर भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ म्हणाले की, “खात्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मी सर्व विभाग सांभाळले आहेत. त्यामुळे कोणताही विभाग मिळाला तरी चालेल. जो विभाग मिळेल तो सांभाळेन.” त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या