Home / मनोरंजन / ‘मिसाइल मॅन’ ते ‘लोकांचे राष्ट्रपती’! डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर, ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

‘मिसाइल मॅन’ ते ‘लोकांचे राष्ट्रपती’! डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर, ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

APJ Abdul Kalam Biopic | कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट डॉ....

By: Team Navakal
APJ Abdul Kalam Biopic

APJ Abdul Kalam Biopic | कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित बायोपिक असणार आहे. या चित्रपटातअभिनेता धनुष (Dhanush) हा मुख्य भूमिका साकारणार आहे.

भारताचे 11 वे राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कलाम यांचा संघर्षमय प्रवास आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते ओम राऊत करणार असून, ‘तान्हाजी’सारख्या ऐतिहासिक चित्रपटासाठी त्यांना ओळखले जाते. धनुष या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार असून, चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल यांच्या ‘अभिषेक अग्रवाल आर्ट्स’ आणि भूषण कुमार यांच्या ‘टी-सिरीज’ बॅनरखाली होणार आहे.

सायविन क्वाड्रास यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून, त्यांनी यापूर्वी ‘नीरजा’, ‘मैदान’ आणि ‘परमाणू’ यांसारख्या बायोपिक्ससाठी लेखन केले आहे.

डॉ. कलाम – विज्ञान, अध्यात्म आणि विनम्रतेचा संगम

अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या कलाम यांनी एरोस्पेस शास्त्रज्ञ ( म्हणून नाव कमावले आणि पुढे भारताचे राष्ट्रपती बनले. या चित्रपटात त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीपासून ते राष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास, शिक्षक आणि कवी म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व, आणि तरुणांमधील प्रेरणास्थान या सर्व पैलूंना स्पर्श करण्यात येणार आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितले, “कलाम हे केवळ राजकीय व्यक्ती नव्हते, तर त्यांनी शिक्षण, नवसंशोधन आणि आत्मनिर्भरतेसाठी काम केले. त्यांची कथा जागतिक तरुणांसाठी, विशेषतः ग्लोबल साउथ मधील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.”

निर्माते अभिषेक अग्रवाल म्हणाले, “कलाम यांचे जीवन मोठ्या पडद्यावर आणणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा चित्रपट भारतीय सिने इतिहासातील एक महत्त्वाचा प्रकल्प ठरेल.” भूषण कुमार म्हणाले, “कलाम हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनाचा भाग होणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.”

चित्रपटाच्या अधिक तपशीलांविषयी अद्याप गोपनीयता राखण्यात आली आहे. मात्र, हा चित्रपट जागतिक स्तरावर भारतीय प्रतिभेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या