Home / महाराष्ट्र / दमदार कामगिरी! देशातील 40 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

दमदार कामगिरी! देशातील 40 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

Maharashtra FDI | महाराष्ट्र राज्याने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये परकीय थेट गुंतवणुकीत (Foreign Direct Investment) देशात अव्वल स्थान पटकावले आहे....

By: Team Navakal
Maharashtra FDI

Maharashtra FDI | महाराष्ट्र राज्याने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये परकीय थेट गुंतवणुकीत (Foreign Direct Investment) देशात अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याने तब्बल 1,64,875 कोटी रुपये गुंतवणूक आकर्षित केली आहे, जी देशाच्या एकूण 4,21,929 कोटी रुपयांच्या FDI च्या 40% आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर याबाबत माहिती देताना सांगितले की, केवळ अंतिम तिमाहीत (जानेवारी-मार्च 2025) 25,441 कोटी रुपये गुंतवणूक आली. “गेल्या दहा वर्षांतील ही महाराष्ट्रातील सर्वाधिक FDI आहे. विशेष म्हणजे, आम्ही पहिल्या नऊ महिन्यांतच मागील सर्व विक्रम मोडले होते,” असे त्यांनी नमूद केले.

राज्यात 2023-24 च्या तुलनेत FDI मध्ये 32% वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या वाढीचे श्रेय अनुकूल धोरणे आणि सुशासनाला दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारयांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राची ही प्रगती झाली असून, विकास आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाप्रती असलेली स्पष्ट बांधिलकी दर्शवते, असेही ते म्हणाले.

फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गेल्या दशकातील FDI च्या आकडेवारीची तुलनात्मक माहिती दिली:

  • 2015-16: 61,482 कोटी रुपये
  • 2016-17: 1,31,980 कोटी रुपये
  • 2017-18: 86,244 कोटी रुपये
  • 2018-19: 57,139 कोटी रुपये
  • एप्रिल-ऑक्टोबर 2019: 25,316 कोटी रुपये
  • 2020-21: 1,19,734 कोटी रुपये
  • 2021-22: 1,14,964 कोटी रुपये
  • 2022-23: 1,18,422 कोटी रुपये
  • 2023-24: 1,25,101 कोटी रुपये

नोव्हेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंतची आकडेवारी यात समाविष्ट नसली, तरी 2024-25 ची आकडेवारी महाराष्ट्राची आर्थिक ताकद आणि सातत्य अधिक दृढ करते.

Web Title:
संबंधित बातम्या