Home / देश-विदेश / अयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा सुरू

अयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा सुरू

अयोध्या- अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्याला आज सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी खास राम जन्मभूमी मंदिर आणि परिसराला...

By: Team Navakal

अयोध्या- अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्याला आज सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी खास राम जन्मभूमी मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी आज शरयू नदीच्या तीरावर भव्य कलश यात्रा काढण्यात आली. गंगा दशहरा हा मुहूर्त या कार्यक्रमासाठी निवडण्यात आला असून, हा मुख्य समारंभ ५ जून रोजी होणार आहे.

आज शरयू घाटावरून कलश यात्रा निघाली. ही यात्रा वीणा चौक, राम पथ, सिंगार हाट आणि रंग महल बॅरिअर मार्गे मंदिर परिसरात पोहोचली. उद्या सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत विविध धार्मिक विधी होतील. यावेळी १,९७५ मंत्रांच्या पठणासह अग्निहोत्र, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा आणि इतर भक्तिपर स्तोत्रांचे पठण केले जाणार आहे. तर ५ जून रोजी प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि प्रभू हनुमान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच संकुलातील इतर सहा मंदिरांमध्येही मुख्य प्राणप्रतिष्ठेचा विधी होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून अयोध्येत दहशतवादविरोधी पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या