Home / महाराष्ट्र / सिल्लोडमध्ये अधिकाऱ्यांच्या टेबलावर विंचू सोडून आंदोलन

सिल्लोडमध्ये अधिकाऱ्यांच्या टेबलावर विंचू सोडून आंदोलन

छत्रपती संभाजीनगर – सिल्लोडमध्ये शासकीय प्रमाणपत्रासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नाही. यामुळे आज धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे...

By: Team Navakal

छत्रपती संभाजीनगर – सिल्लोडमध्ये शासकीय प्रमाणपत्रासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नाही. यामुळे आज धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या टेबलावर १० जिवंत विंचू सोडून आंदोलन केले.
अनुसूचित जमातींना जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वडिलांकडे वैध प्रमाणपत्र असतानाही मुलांना प्रमाणपत्र दिले जात नाही. अधिकाऱ्यांकडून अडथळे निर्माण करण्यात येतात अशी आंदोलकांची तक्रार होती.
प्रमाणपत्र मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आठवड्यातून केवळ दोनच दिवस कार्यालयीन कामकाज होत असल्याने अनेक अर्ज प्रलंबित राहतात. काही कर्मचाऱ्यांकडून प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी करण्यात आली असा आरोप करण्यात आला. यावेळी आकाश पाडळे यांनी पारंपरिक आदिवासी पेहरावात जंगलातून पकडून आणलेले विंचू अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडत निषेध नोंदवला. त्यानंतर त्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या