Home / देश-विदेश / हॉटेल रूम भाड्यावरील जीएसटी कमी करा! मुख्यमंत्र्यांना निवेदन

हॉटेल रूम भाड्यावरील जीएसटी कमी करा! मुख्यमंत्र्यांना निवेदन

पणजी- गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (जीसीसीआय) हॉटेल रूमच्या भाड्यावर असलेला १८ टक्के जीएसटी कमी करून १२ टक्के जीएसटी...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

पणजी- गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (जीसीसीआय) हॉटेल रूमच्या भाड्यावर असलेला १८ टक्के जीएसटी कमी करून १२ टक्के जीएसटी लागू करण्याची मागणी केली आहे. गोव्यातील हॉटेल क्षेत्राला चालना मिळावी आणि जीएसटी कररचनेत समानता यावी हा या मागचा उद्देश असून यासाठी चेंबरच्या शिष्टमंडळाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले.

गोवा चेंबरचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांना सांगितले की, सध्या ७५०० रुपयांपेक्षा अधिक भाड्याच्या हॉटेल रूमवर १८ टक्के जीएसटी लागू आहे. हा दर कमी करून सर्व रूमवर १२ टक्के जीएसटी लागू करावा, यामुळे राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल आणि स्पर्धात्मकता वाढेल. १५ जूननंतर होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत गोव्याचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्री डॉ. सावंत करणार आहेत. त्याआधी ही मागणी करण्यात आली. दरम्यान, फक्त हॉटेलच नव्हे, तर चेंबरने होम-स्टे, वेअरहाऊस आणि बांधकाम सेवा क्षेत्रासाठीही ‘इन्पुट टॅक्स क्रेडिट’ (आयटीसी) उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या