Home / महाराष्ट्र / हिट अँड रनप्रकरणी ३८ वर्षांनी आरोपीची निर्दोष मुक्तता

हिट अँड रनप्रकरणी ३८ वर्षांनी आरोपीची निर्दोष मुक्तता

मुंबई- महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी १९८७ साली झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला ३८ वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले. या अपघातात...

By: Team Navakal

मुंबई- महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी १९८७ साली झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला ३८ वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर नऊ जण जखमी झाले होते. नारायण बाबू कोटीयान असे निर्दोष मुक्त केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते विलेपार्ले येथील रहिवासी आहेत. तक्रारदाराला आरोपीची ओळख न पटवता आल्याने आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आले.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, सेड्रिक डिसिल्वा या जुहू विमानतळावरील ओकानागन हेलिकॉप्टर लिमिटेड येथे अभियंता म्हणून काम करणाऱ्या तक्रारदाराच्या तक्रारीवरून कोटियानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. डिसिल्वा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, ३१ डिसेंबर १९८७ च्या संध्याकाळी कुलाबा परिसरात मित्रांसोबत जीपने फिरत असताना रीगल सिनेमाच्या बाजूने कुलाब्याकडे येणाऱ्या एका वेगवान अ‍ॅम्बेसेडर कारने जीपला धडक दिली आणि कार वेगाने निघून गेली. यात जीप उलटली आणि मागच्या सीटवर बसलेल्या एका मित्राचा मृत्यू झाला तरएकजण गंभीर जखमी झाला. यावेळी आमच्या सोबत दुचाकीवरून जाणाऱ्या मित्राने कार पाहिली आणि तिचा नंबर नोंदवला. त्यानंतर आम्ही याची तक्रार पोलिसात दिली व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. कार नंबरच्या आधारे कोटीयानचा शोध घेण्यात आला. या प्रकरणातील आरोप फेब्रुवारी १९९१ मध्ये निश्चित करण्यात आले आणि डिसिल्वाची चौकशी नोव्हेंबर १९९२ मध्येच करण्यात आली. मात्र हा खटला जास्त काळ चालला नाही. दरम्यान, सोमवारी डिसिल्वा यांनी त्यांच्या साक्षीत घटना सांगितली परंतु कोटीयान यांना ओळखले नाही. कार वेगात असल्याने त्यांना त्यांचा चेहरा दिसला नाही असेही डिसिल्वा म्हणाले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या