Home / राजकीय / सतेज पाटलांच्या परवानगीने निलेश चव्हाणला शस्त्र परवाना?

सतेज पाटलांच्या परवानगीने निलेश चव्हाणला शस्त्र परवाना?

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण याला काॅंग्रेसचे तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या परवानगीने शस्त्र परवाना देण्यात...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण याला काॅंग्रेसचे तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या परवानगीने शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, चव्हाणवर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही ही माहिती लपवून त्याला परवाना देण्यात आला.

२०२२ मध्ये निलेश चव्हाणने पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याने पोलिसांनी अर्ज फेटाळला. त्यानंतर चव्हाणने गृह विभागाकडे अपील दाखल केले आणि त्या सुनावणीदरम्यान तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत त्याला परवाना मंजूर करण्यात आला. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी चव्हाणवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मंत्र्यांना दिली नाही. या प्रकारानंतर पोलीस प्रशासन आणि गृह विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी या परवाना मंजुरी प्रक्रियेत चव्हाणला मदत केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. याशिवाय, निलेश चव्हाणने राजकीय ओळखींचा वापर करून परवाना मिळवल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या