Home / देश-विदेश / डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशांतील नागरिकांच्या अमेरिकेत येण्यावर बंदी का घातली? जाणून घ्या कारण

डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशांतील नागरिकांच्या अमेरिकेत येण्यावर बंदी का घातली? जाणून घ्या कारण

US Travel Ban On 12 Countries | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा कार्यकारी आदेश जारी करत,...

By: Team Navakal
US Travel Ban On 12 Countries

US Travel Ban On 12 Countries | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा कार्यकारी आदेश जारी करत, अमेरिकेत प्रवेशावर कठोर निर्बंध लावले आहेत. नव्या आदेशानुसार १२ देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे, तर ७ देशांवरील नागरिकांवर आंशिक निर्बंधलादण्यात आले आहेत.

या बंदीच्या यादीत अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा समावेश आहे.

आंशिक निर्बंधित देश

तसेच, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएलाया सात देशांवरील निर्बंध विशिष्ट स्थलांतर आणि गैर-स्थलांतर व्हिसा प्रकारांपुरते मर्यादित राहणार आहेत.

कोलोरॅडोतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कोलोरॅडो ज्यातील ज्यू निदर्शनांवरील हल्ल्याचा संदर्भ देत ट्रम्प यांनी सांगितले, “बेकायदेशीर विदेशी नागरिकांच्या प्रवेशामुळे देशाला असलेल्या धोक्यांचे हे स्पष्ट उदाहरण आहे.” या हल्ल्यासाठी दोषारोप एका अशा व्यक्तीवर ठेवण्यात आला, जो अमेरिकेत बेकायदेशीरपणेराहत होता.

व्हाईट हाऊस प्रशासनाने या आदेशाचे समर्थन करत यामागचे कारण सांगितले आहे. यामध्ये तालिबानच्या अफगाणिस्तानवरील ताब्याचा, इराण व क्युबा सारख्या देशांचा राज्यप्रायोजित दहशतवाद, हैतीहून मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेकायदेशीर स्थलांतराचा उल्लेख आहे.

तसेच चाड आणि एरिट्रिया या देशांवर अमेरिकेच्या स्थलांतर कायद्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चाडचा B1/B2 व्हिसा ओव्हरस्टे दर 49.54% तर एरिट्रियाचा F/M/J व्हिसा ओव्हरस्टे दर 55.43% इतका असल्याचे ट्रम्प प्रशासनाने निदर्शनास आणले आहे.

ही ट्रम्प यांची प्रवेशबंदीवर आधारित पहिली कार्यवाही नाही. २०१७ मध्ये, ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशांवरील बंदी जाहीर केली होती. त्या आदेशाला २०१८ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन लाभले होते. मात्र, २०२१ मध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही बंदी रद्द केली होती.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या