Home / देश-विदेश / रशिया विरोधात पन्नास देश युक्रेनच्या मदतीसाठी सज्ज

रशिया विरोधात पन्नास देश युक्रेनच्या मदतीसाठी सज्ज

लंडन – युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात अधिक बळकटी देण्यासाठी ब्रिटनसह ५० देशांनी एकत्र येत मोठा निर्णय घेतला आहे. या देशांनी युक्रेन...

By: Team Navakal

लंडन – युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात अधिक बळकटी देण्यासाठी ब्रिटनसह ५० देशांनी एकत्र येत मोठा निर्णय घेतला आहे. या देशांनी युक्रेन संरक्षण गटात सामील होऊन लष्करी, आर्थिक आणि मानवी मदतीचा पुरवठा वाढवण्याचे वचन दिले आहे.
ब्रुसेल्स येथे झालेल्या ५० राष्ट्रांच्या युक्रेन संरक्षण संपर्क गटाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ब्रिटनचे नवे संरक्षण सचिव जॉन हिली यांनी हा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले,ब्रिटन युक्रेनला या वर्षीच शेकडो हजार ड्रोन आणि मोठ्या प्रमाणात तोफगोळा पुरवणार आहे.
ब्रिटनने जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत १.४ लाख तोफगोळ्यांचा पुरवठा केला आहे. युक्रेनियन सैनिकांचे प्रशिक्षण देण्यासाठीही २४७ मिलियन पौंड खर्च करण्यात येणार आहेत.ब्रिटनने एप्रिल २०२६ पर्यंत युक्रेनला एक लाख ड्रोन पुरवण्याची घोषणा केली आहे. ही संख्या आतापर्यंतच्या तुलनेत दहा पट अधिक आहे. ४.५ अब्ज पौंडांच्या लष्करी सहाय्य पॅकेजमध्ये या नव्या ड्रोन योजनेचा समावेश आहे. त्यापैकी ३५० मिलियन पौंड फक्त ड्रोनसाठी खर्च करण्यात येणार आहेत.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या