Home / देश-विदेश / काश्मीरात ३२ ठिकाणांवर एनआयएकडून छापेमारी

काश्मीरात ३२ ठिकाणांवर एनआयएकडून छापेमारी

श्रीनगर – काश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा कट आखला जात असल्याचा सुगावा लागल्याने राष्ट्रीय सुरक्षा संस्था एनआयएने आज काश्मीर खोऱ्यात मोठे धाडसत्र...

By: Team Navakal


श्रीनगर – काश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा कट आखला जात असल्याचा सुगावा लागल्याने राष्ट्रीय सुरक्षा संस्था एनआयएने आज काश्मीर खोऱ्यात मोठे धाडसत्र राबवले. या धाडसत्रात एकूण ३२ ठिकाणांवर एनआयएच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकले.
उत्तर काश्मीरमधील शोपियान, कुलगाम आणि पुलवामा तर दक्षिण काश्मीरमधील सोपोर आणि कुपवाडा जिल्ह्यांत हे छापे टाकण्यात आले. एनआयएच्या पथकांबरोबरच जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान या धाडसत्रात सहभागी होते.
शोपियान जिल्ह्यात रेबन निलदुरा आणि चेक-ए-चोलँड या खेडेगावांमध्ये काही घरांवर छापे टाकण्यात आले. तर शेजारच्या कुलगाम जिल्ह्यात देवसर, बुगाम, सोनिगाम आणि मांझगाम या गावांमध्ये धाडी टाकण्यात आल्या,अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या