Home / News / गडचिरोली जिल्ह्यासाठी खाण प्राधिकरणाची स्थापना

गडचिरोली जिल्ह्यासाठी खाण प्राधिकरणाची स्थापना

गडचिरोली– खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यातील खाण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आज गडचिरोली जिल्हा खनिज...

By: Team Navakal

गडचिरोली– खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यातील खाण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आज गडचिरोली जिल्हा खनिज प्राधिकरण स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय प्राधिकरण हे खाणविकासाचे नियोजन व अंमलबजावणी पाहणार आहे.
यासंबंधीच्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे की, गडचिरोलीमध्ये लोहखनिज, हेमाटाईट, मॅग्नेटाईट, बँडेड हेमाटाईट क्वार्टझाईट, चुनखडी, डोलोमाईट आणि कोळसा यांसारखी मौल्यवान खनिजसंपत्ती आढळते. हा सर्व कच्चा माल विविध उद्योगांसाठी, विशेषतः पोलाद निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्यामुळे हा अध्यादेश तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आला आहे. ३० जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक सादर केले जाणार आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूर खाणपट्ट्यांची जलद अंमलबजावणी, प्रशासकीय सुलभता, आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती साधली जाणार आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक केंद्र बनवण्यासाठी योजनांची आखणी आणि अंमलबजावणी केली जाणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या