Home / देश-विदेश / खासदार महुआ मोईत्रा यांचा जर्मनीत पार पडला विवाह, कोण आहेत पती पिनाकी मिश्रा? जाणून घ्या

खासदार महुआ मोईत्रा यांचा जर्मनीत पार पडला विवाह, कोण आहेत पती पिनाकी मिश्रा? जाणून घ्या

Mahua Moitra Marries Ex-MP Pinaki Misra In Germany | तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी गुपचूप...

By: Team Navakal
Mahua Moitra Marries Ex-MP Pinaki Misra In Germany

Mahua Moitra Marries Ex-MP Pinaki Misra In Germany | तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी गुपचूप लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी त्यांचे दीर्घकालीन सहकारी व बीजू जनता दलाचे माजी खासदार पिनाकी मिश्रा (Pinaki Misra) यांच्यासोबत विवाह केला आहे. हा खासगी विवाहसोहळा 30 मे रोजी जर्मनीमध्ये पार पडल्याचे सांगितले जाते.

महुआ मोईत्रा यांनी लग्नानंतरचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) शेअर करत अधिकृत घोषणाही केली. महुआ मोईत्रा यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांनी यापूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉरसन यांच्याशी लग्न केले होते. वकील जय अनंत देहदराय यांच्याशी देखील त्यांचे नाव जोडले गेले होते.

महुआ मोईत्रा या विरोधी पक्षाचा एक लोकप्रिय चेहरा असून, संसदेतील त्यांच्या प्रभावी भाषणांसाठी त्या ओळखल्या जातात. पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून त्या दोन वेळा खासदार निवडून आल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी मोईत्रा एक गुंतवणूक बँकर होत्या.

कोण आहेत पिनाकी मिश्रा?

1959 मध्ये जन्मलेले 64 वर्षीय पिनाकी मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत. त्यांनी यापूर्वी महुआ मोईत्रा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडली आहे. मिश्रा यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) पूर्ण केली आणि त्यानंतर ते राजकीय कारकिर्दीकडे वळले.

ते BJD चे पुरी मतदारसंघातील माजी खासदार आहेत. संसदेत मिश्रा हे वित्त स्थायी समिती आणि व्यवसाय सल्लागार समितीसह अनेक उच्च-स्तरीय समित्यांचे सदस्य होते.

ते चार वेळा खासदार होते. त्यांनी 1996 मध्ये पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर त्यांचा पहिला लोकसभा विजय मिळवला, ज्यात त्यांनी माजी केंद्रीय मंत्री ब्रज किशोर त्रिपाठी यांचा पराभव केला. त्यांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे यापूर्वी संगीता मिश्रा यांच्याशी लग्न झाले होते आणि त्यांना त्यांच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या