Home / News / बिहारमध्ये मेहुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न

बिहारमध्ये मेहुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न

पाटणा – बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये भावोजीने मेहुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. मुजफ्फरपूरच्या सिकंदरपुरमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या घरात शिरून आरोपीने...

By: Team Navakal

पाटणा – बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये भावोजीने मेहुणीवर अ‍ॅसिड टाकून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. मुजफ्फरपूरच्या सिकंदरपुरमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या घरात शिरून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला नकार देताच तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. या हल्ल्यात तरुणीच्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याने घरातील कपाट उघडून सगळे दागिने घेतले आणि तरुणीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तो पसार झाला.

याप्रकरणी पीडित तरुणीने स्वतः पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात हे प्रकरण कौटुंबिक वादातून झाल्याचे सांगण्यात येते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. यासाठी तो त्याच्या मेहुणीला जबाबदार धरत आहे. गेल्या काही दिवसांपासून याच गोष्टीवरून त्यांच्यात वाद सुरू होता. याप्रकरणी कांती पोलीस ठाण्यात एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या