Home / महाराष्ट्र / पवार काका-पुतणे उद्या पुन्हा एकाच मंचावर

पवार काका-पुतणे उद्या पुन्हा एकाच मंचावर

पुणे– शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यातील मांजरी...

By: Team Navakal

पुणे– शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उद्या ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी शरद पवार असतील, तर अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात राज्यभरातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, सहकारी बँकांचे अधिकारी आणि साखर उद्योगातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, हवामान आधारित निर्णय, सिंचन नियोजन आणि रोग व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. एकत्र मंचावर येणाऱ्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या देखील लक्षवेधी ठरणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या