Home / महाराष्ट्र / न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळा ईडीला तुरुंगात चौकशीची परवानगी

न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळा ईडीला तुरुंगात चौकशीची परवानगी

मुंबई- न्यू इंडिया सहकारी बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार व अनियमतते प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे....

By: Team Navakal


मुंबई- न्यू इंडिया सहकारी बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार व अनियमतते प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या एकूण ८ आरोपींची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
ईडीने एप्रिल महिन्यात न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी आरोपींच्या चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी अटकेत असलेले हितेश मेहता, धर्मेश पौन, अभिमन्यू भुवन, मनोहर मारुतवार, कपिल डेढिया आदी आरोपी सध्या की आर्थर रोड तुरुंगात आहेत. न्यायालयाने कारागृह अधिक्षकांनाही ईडीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपकरणांसह तुरुंगात प्रवेश करु देण्याचे आदेश दिले आहेत. न्यू इंडिया को ऑप बँकेत या आरोपींनी मिळून कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार केले. पात्रता नसलेल्या लोकांना कर्ज देणे, लाच घेऊन खाते निष्क्रिय करणे त्याचप्रमाणे बँकेच्या मालमत्ता कवडीमोल किंमतीत विकणे असे आरोप आहेत. रिझर्व बँकेने अचानक टाकलेल्या धाडीत बँकेत परवानगी पेक्षा अधिक रोख रक्कम आढळली होती. बँकेत २० कोटी रुपयांची रोकड ठेवण्याची परवानगी असताना या बँकेत १०० कोटी रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. या आरोपींनी मिळून बँकेत तब्बल ४०० कोटी रुपयांचा गैरव्यवहारही केला.

Web Title:
संबंधित बातम्या