Home / News / चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरविण्यास तयार

चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरविण्यास तयार

बीजिंग- चीन सरकार अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरवण्यास तयार झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी...

By: Team Navakal

बीजिंग- चीन सरकार अमेरिकेला दुर्मिळ खनिजे पुरवण्यास तयार झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पृथ्वीवरील दुर्मिळ खनिजे अमेरिकेत पुरवण्यास सहमती दर्शवल्याचे म्हटले आहे. ही सहमती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या खनिजांच्या पुरवठ्यासाठी चीनवर लादलेल्या निर्बंधांबाबत दिलासा देणारी आहे.

अमेरिकेला चीनकडून अनेक दुर्मिळ खनिजे आयात करावी लागतात. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आयात कर लादल्याने चीनने एप्रिल महिन्यात या खनिजांची अमेरिकेत निर्यात करण्यासाठी स्थगिती दिली होती. या खनिजांमध्ये समारियम, गॅडोलीनियम, यिट्रियम, डिस्प्रोसियम,टेरबियम व ल्यूटेटियम आदी दुर्मिळ खनिजांचा समावेश होता. परंतु चीनने आता ही बंदी उठविण्यास होकार दिला आहे. ९ जून रोजी अमेरिका व चीनचे अधिकारी लंडनमध्ये दोन्ही देशांतील व्यापारावर चर्चा करणार आहेत.चीन हा देश जगातील सुमारे ९० टक्के दुर्मिळ खनिजांचे उत्पादन करतो.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या