Home / News / सोनम रघुवंशीने पतीच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना २० लाखांचे आमिष दिले

सोनम रघुवंशीने पतीच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना २० लाखांचे आमिष दिले

शिलॉंग – मेघालयमधील शिलॉंग येथे मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजते आहे. एका...

By: Team Navakal

शिलॉंग – मेघालयमधील शिलॉंग येथे मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजते आहे. एका डोंगरावर कुजलेल्या अवस्थेत राजाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणात आता आणखी नवा खुलासा झाला असून सोनमने आपल्या पतिची हत्त्या करणाऱ्या मारेकऱ्यांना २० लाख रुपयांचे आमिष दिल्याचे सांगण्यात येते.


२३ मे रोजी सोनमने शिलाँगमध्ये राजाला मारण्याचा प्लॅन बनवला होता. त्यादिवशी तिने आपल्या सासूला शेवटचा फोन केला होता. ती सासूशी बोलताना पायऱ्या चढत होती. याचवेळी तीन मारेकरीही पायऱ्या चढत होते. पायऱ्या चढताना मारेकरी थकले. त्यामुळे ते राजाला मारण्यास नकार देऊ लागले. नंतर, ते तिघेही राजासोबत चालायला लागले. थकल्याचे नाटक करत सोनमही त्यांच्या मागे चालत होती. मारेकरी हत्येला उशीर करत होते हे सोनमला सहन झाले नाही. यानंतर तिने मागून त्याला मारण्यासाठी आवाज दिला. यावर आरोपींनी डोंगर चढून कंटाळा आल्याचे सांगितले. मात्र तिला राजाला कसेही करून जीवे मारायचे होते. त्यामुळे सोनमने त्यांना १४ लाखांऐवजी २० लाख रुपये देण्याचे कबुल केले. मग तिने राजाच्या पाकिटातून १५ लाख रुपये काढले आणि मारेकऱ्यांना दिले. त्या कारणाने राजाला मारण्यास ते तयार झाले, अशी कबुली मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर दिली.

Web Title:
For more updates: , , , , , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या