Home / News / लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी अखेर पोलिसांना सापडली

लड्डा दरोड्यातील ३० किलो चांदी अखेर पोलिसांना सापडली

छत्रपती संभाजीनगर – उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील ३२ किलो चांदीपैकी ३० किलो चांदीचा अखेर २४ दिवसांनी पोलिसांनी...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


छत्रपती संभाजीनगर – उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील ३२ किलो चांदीपैकी ३० किलो चांदीचा अखेर २४ दिवसांनी पोलिसांनी छडा लावला. एका बंद कारमध्ये लपवून ठेवलेली चांदी पोलिसांनी जप्त केली.
या दरोड्यात ३२ किलो चांदी आणि साडेपाच किलो सोने असा ऐवज चोरट्यांनी लुटला. दरोड्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा पोलीस चकमकीत मारला गेला. त्यावरून फार गदारोळ माजला होता. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी १५ संशयितांना अटक केली आहे. मात्र त्यांच्याकडून अवघे दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांना मिळाले. त्यामुळे पोलीसांच्या तपासावरही संशय व्य़क्त होऊ लागला होता.
अखेर मुख्य आरोपी अमोल खोतकरची बहीण रोहिणी हिच्या जबाबातून पोलिसांना कारमध्ये लपवलेल्या चांदीची माहिती मिळाली. दरोडा टाकून पसार होण्याआधी अमोलने आपल्या कारच्या डिकीत ही ३० किलो चांदी लपवून ठेवली होती. याची माहिती त्याने बहीण रोहिणीला दिली होती. तिने पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी चांदी जप्त केली. मात्र साडेपाच किलो सोन्याचे गूढ अद्याप कायम आहे.

Web Title:
संबंधित बातम्या