Home / News / उबर बाईक चालकाकडून महिला प्रवाशाला मारहाण व्हिडीओ व्हायरल

उबर बाईक चालकाकडून महिला प्रवाशाला मारहाण व्हिडीओ व्हायरल

मुंबई– गोरेगावमध्ये उबर बाईक चालकाने महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याची घटना उघड झाली आहे. या चालकाने आधी महिला प्रवाशाला शिवीगाळ केली....

By: Team Navakal

मुंबई– गोरेगावमध्ये उबर बाईक चालकाने महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याची घटना उघड झाली आहे. या चालकाने आधी महिला प्रवाशाला शिवीगाळ केली. नंतर तिला मारहाण केली. मात्र, यावेळी सतर्क भाजपा कार्यकर्त्यांमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर चालक फरार झाला होता. परंतु अवघ्या २० मिनिटांत आरोपीला वनराई पोलिसांनी अटक केली. ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उबर बाईक चालकाने या तरुणीला गोरेगाव पूर्वेकडील आयबी पटेल रस्त्यावर सोडले. त्यानंतर त्याने तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून तरुणीला सोडवले. मात्र संधीचा फायदा घेत उबर बाईक चालक तिथून फरार झाला. याप्रकरणी तरुणीने वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनतर पोलिसांनी आरोपीला अवघ्या २० मिनिटांत अटक केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच उबेर, ओला सारख्या कंपन्यांनी तरुणांना कामावर ठेवले पाहिजे असे मत गोरेगाव भाजपा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी व्यक्त केले.

Web Title:
For more updates: , , , , , , , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या