Home / महाराष्ट्र / बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीवर अत्याचार

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीवर अत्याचार

बीड– बीडच्या माजलगावमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित तरुणीचे पोट दुखू...

By: Team Navakal

बीड– बीडच्या माजलगावमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित तरुणीचे पोट दुखू लागल्याने तीची तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले. ही घटना मे महिन्यात उघडकीस आली असून आता याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० वर्षीय पीडित तरुणीची ओळख सुनील अलझेंडे या तरुणाशी झाली होती. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास जिंकला . त्यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले. सुरुवातीला तरुणीला लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर तिने त्याला विरोध केला नाही. मात्र नंतर सुनीलने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. मे महिन्यात तरुणीच्या सतत पोटात दुखू लागले. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिला माजलगाव येथील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले. यावेळी तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सुनील अलझेंडे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या