Home / News / नारायण राणेंच्या विरोधात महाजनांनी शड्डू ठोकले

नारायण राणेंच्या विरोधात महाजनांनी शड्डू ठोकले

छत्रपती संभाजीनगर – भाजपा खासदार नारायण राणे यांच्या विरोधात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आज शड्डू ठोकत तुम्ही चुकीच्या बिळात...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

छत्रपती संभाजीनगर – भाजपा खासदार नारायण राणे यांच्या विरोधात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आज शड्डू ठोकत तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला असे म्हणत त्यांना आव्हान दिले. पुन्हा आमच्या विरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना दिला. त्यानंतर महाजन आक्रमक झाले.
मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, मी क्रांती चौकात त्यांची अर्धा तास वाट पाहणार आहे. मला पोलिसांनी अर्ध्या तासाची परवानगी दिली आहे. मी राणे समर्थकांना घराचा पत्ता सांगितला आहे. त्यांनी घराकडे येऊन काय मारहाण करायची ती करावी. मी त्यापुढे जाऊन सांगतो की, मला ज्या पद्धतीची धमकी दिली होती. त्यानंतर मी सुद्धा जीवावर उदार झालो आहे. नारायण राणे तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला. मी प्रकाश महाजन आहे.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही का धमक्या देत आहात ? कार्यकर्त्यांना सांगून मला का फोनवर धमक्या देता? तुम्ही सांगा मी कणकवलीत येतो. तुमच्या बंगल्यापर्यंत येतो. नारायण राणेंनी मला धमकी दिली आहे. त्यांच्या विरोधात मी शड्डू ठोकतो. मी राज ठाकरेंचा सैनिक आहे. मी घाबरणार नाही. मी कधीच कोणावर सभ्यता सोडून टीका केली नाही. एक बोली भाषेतील शब्द वापरला तर तुम्हाला राग आला. कारण मी खरे बोललो.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या