Home / News / सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवू शकत नाही Minister chandrashekhar bawankule

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवू शकत नाही Minister chandrashekhar bawankule

मुंबई – मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज आहेत असे वृत्त...

By: Team Navakal
Chandrashekhar Bawankule Meets Sanjay Shirsat
Social + WhatsApp CTA

मुंबई – मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज आहेत असे वृत्त असताना आज revenueminister chandrashekhar bawankule यांनी शिरसाट यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, सामाजिक न्याय आणि आदिवासी कल्याण विभागाचा निधी कोणतेही सरकार कधीही वळवू शकत नाही, कारण हा निधी राखीव असतो. कधी कधी निधीच्या वितरणात विलंब होतो, मात्र याचा अर्थ अन्याय केला जातो असा होत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार, किंवा आमचे सध्याचे सरकार कधीही सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा निधी कमी करणार नाही. हे दोन्ही विभाग आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

शिरसाट यांच्यासोबत झालेल्या बैठकीविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले की, कामठी येथील जागतिकख्याती असलेल्या ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’च्या विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू असून माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या सोबतही त्यासंदर्भात चर्चा झाली. या बुद्धिस्ट स्थळाच्या जागा आणि विकासकामांसंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे होते. त्यामुळे आम्ही शिरसाट यांच्या घरी आलो. लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री शिरसाट आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन होणार आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या