Home / महाराष्ट्र / मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल रेल्वे तिकीट मिळणार नाही

मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल रेल्वे तिकीट मिळणार नाही

मुंबई – रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशाचा मोबाईल नंबर आधार...

By: Team Navakal
mobile number is linked with their Aadhaar card
Social + WhatsApp CTA


मुंबई – रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशाचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक (aadhar card link) केला नसेल तर ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार नाही.येत्या १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल,अशी माहिती रेल्वेचे प्रवक्ते दिलीप कुमार यांनी दिली.


ऑनलाईनप्रमाणे तिकीट खिडकीवरून (ऑफलाईन) तिकीट बुकिंगसाठी ओटीपी आधारित पद्धत लागू करण्यात येणार आहे. म्हणजे तिकीट खिडकीवरून ऑफलाईन तिकीट बुकिंग करताना आपल्या मोबाईल फोनवर ओटीपी येईल. हा ओटीपी खिडकीवरील कर्मचाऱ्याला दिल्यानंतरच तिकीट बुकिंग होणार आहे. ऑफलाईन बुकिंगसाठीची ही पद्धत १५ जुलैपासून सुरू होणार आहे. बनावट आधार कार्ड वापरून केल्या जाणाऱ्या तिकीट बुकिंगला आळा घालण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे,असे दिलीप कुमार यांनी सांगितले.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या