Home / राजकीय / सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध

सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध

नाशिक – UBT माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या BJP प्रवेशाच्या चर्चांदरम्यान नाशिकमधील भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला...

By: Team Navakal
sudhakar badgujar nashik
Social + WhatsApp CTA

नाशिक – UBT माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या BJP प्रवेशाच्या चर्चांदरम्यान नाशिकमधील भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आज त्यांनी नाशिक मध्ये जलसंपदा Minister girish mahajan यांची भेट घेऊन बडगुजर यांच्या प्रवेशाविरोधात नाराजी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी बडगुजर यांनी खुद्द मुख्यमंत्री devendra fadnavis यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ही भेट उबाठा खासदार संजय राऊत नाशिकमध्ये असताना झाली. त्यानंतर बडगुजर यांनी उघडपणे पक्षातील नाराजी जाहीर केली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली.
बडगुजर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनंतर भाजपा आमदार सीमा हिरे यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. मात्र एका नाशिकमधील कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या प्रवेशाला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी सांगितले की गिरीश महाजन संबंधितांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील.याच पार्श्वभूमीवर काही माजी नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस व बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. तर आज गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बडगुजर यांच्या प्रवेशामुळे स्थानिक असंतोष उफाळून आला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या