Home / महाराष्ट्र / इंदापूरमध्ये पोलीस हवालदार बेपत्ता; पोलीस निरीक्षकावर धमकीचा आरोप

इंदापूरमध्ये पोलीस हवालदार बेपत्ता; पोलीस निरीक्षकावर धमकीचा आरोप

पुणे – पुण्यातील इंदापूर पोलीस (Police) ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे कालपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्याआधी त्यांनी...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – पुण्यातील इंदापूर पोलीस (Police) ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे कालपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्याआधी त्यांनी लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीमुळे खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीत त्यांनी थेट इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. केमदारणे यांनी आपल्या चिठ्ठीत लिहिले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस Constable सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून त्यांना त्रास देत होते. तुझी नोकरी व आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेन, अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. माझ्या या अवस्थेला पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत, असाही उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला आहे.

या प्रकरणी केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी सांगितले की, केमदारणे यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले असून त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील आरोपांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाईल.

या संपूर्ण प्रकरणात एक Audio clip ही Viral झाली आहे. या क्लिपमध्ये कोकणे हे एका पोलीस कर्मचाऱ्याशी बोलत आहेत की, “त्याला समजावून सांग, नाहीतर गाडून टाकीन.”

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या