Jaranage supported kadu protest
अमरावती – माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला. जरांगे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की,तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत.लोक येथे येऊन भाषण ठोकून जातात , ती प्रथा आधी बंद करायला पाहिजे.आज बच्चू कडू तुम्ही जीव द्यायला तयार असाल तर सर्व समाजातील शेतकऱ्यांनी तुमच्य मागे उभे राहिले पाहिजे. तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकारला सळो की पळो करण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यांची लवकर दखल घ्यावी.
कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस होता. शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








