Home / देश-विदेश / हनिमूनला गेलेले आणखी एक जोडपे सिक्किममधून बेपत्ता

हनिमूनला गेलेले आणखी एक जोडपे सिक्किममधून बेपत्ता

गंगटोक – इंदूरच्या राजा रघुवंशीच्या हत्येची खळबळजनक घटना ताजी असतानाच, आता आणखी एका नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस...

By: Team Navakal
honeymoon couple goes missing in Sikkim

गंगटोक – इंदूरच्या राजा रघुवंशीच्या हत्येची खळबळजनक घटना ताजी असतानाच, आता आणखी एका नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतापगडचे कौशल्येंद्र प्रताप सिंह (२९) आणि त्यांची पत्नी अंकिता (२६) हे दोघे हनिमूनसाठी सिक्किमला गेले होते, मात्र गेल्या १२ दिवसांपासून ते बेपत्ता आहेत.

या दोघांचे लग्न ५ मे रोजी झाले होते आणि २४ मे रोजी ते हनिमूनसाठी सिक्कीमला रवाना झाले. मात्र, २९ मेपासून हे दाम्पत्य बेपत्ता झाले आहे.
दरम्यान, 29 मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास सिक्कीममधील तिस्ता नदीच्या परिसरात पर्यटकांची एक गाडी मुसळधार पावसात खोल दरीत कोसळली, अशी माहिती सिक्किम पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी शोध घेतला असता एक जण मृतावस्थेत, तर दोन जण जखमी अवस्थेत सापडले. गाडीत एकूण दहा पर्यटक होते. त्यापैकी आठ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. कौशल्येंद्र आणि अंकिता या गाडीत होते का याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या