Home / देश-विदेश / Israel Iran Conflict | ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ काय आहे? इस्रायलने इराणवर हल्ला का केला? जाणून घ्या

Israel Iran Conflict | ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ काय आहे? इस्रायलने इराणवर हल्ला का केला? जाणून घ्या

Operation Rising Lion | मध्य पूर्वेतील कट्टर शत्रू असलेल्या इस्रायलने (Israel) आज (13 जून) पहाटे इराणची (Iran) राजधानी आणि इतर...

By: Team Navakal
Israel Iran Conflict

Operation Rising Lion | मध्य पूर्वेतील कट्टर शत्रू असलेल्या इस्रायलने (Israel) आज (13 जून) पहाटे इराणची (Iran) राजधानी आणि इतर भागांवर मोठे हल्ले केले. या हल्ल्यांचे लक्ष्य इराणचा अणु कार्यक्रम होता, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये सर्वव्यापी युद्धाची शक्यता वाढली आहे. इस्त्रायने या मोहिमेला ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ (Operation Rising Lion) असे नाव दिले आहे. तर दुसरीकडे इराणने देखील हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.

1980 च्या दशकातील इराकसोबतच्या युद्धानंतर इराणवर झालेला हा सर्वात मोठा मानला जात आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केले, ही एक लक्ष्यित लष्करी कारवाई आहे, ज्याचा उद्देश इस्रायलच्या अस्तित्वाला इराणपासून असलेला धोका दूर करणे आहे. हा धोका दूर होईपर्यंत ही मोहीम सुरू राहील”

इराणचा अणु कार्यक्रम

इराणच्या वेगाने प्रगती करत असलेल्या अणु कार्यक्रमावरून वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाले आहेत आणि यामुळे इराणकडून निश्चितच प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलला ‘कठोर शिक्षा’ दिली जाईल असा इशारा दिला आहे.

इराणच्या निमलष्करी रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख जनरल होसेन सलामी यांचा मृत्यू झाल्याची इराणच्या सरकारी माध्यमाने पुष्टी केली आहे.

इस्रायली नेत्यांनी या पूर्वनियोजित हल्ल्याला देशाच्या अस्तित्वासाठीची लढाई म्हणून संबोधले आहे. इराण अणुबॉम्ब बनवण्याची तयारी केल्यास अशा तात्काळ धोक्याला टाळण्यासाठी आवश्यक होते. मात्र, इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या किती जवळ आहे किंवा इराणने लवकरच हल्ला करण्याची योजना आखली होती का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खामेनी यांनी एक निवेदन जारी केले. या निवेदनात हल्ल्यात वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि शास्त्रज्ञ मारले गेल्याची पुष्टी केली आहे. “इस्रायलने आपल्या प्रिय देशात गुन्हा करण्यासाठी आपला दुष्ट आणि रक्तरंजित हात पुढे केला, निवासी केंद्रांवर हल्ला करून आपली वाईट वृत्ती दर्शवली आहे. असे खामेनी म्हणाले.

‘ऑपरेशन रायझिंग लायन’ काय आहे?

इस्रायली पंतप्रधानांनी घोषित केलेल्या या ऑपरेशनचा उद्देश इस्रायलच्या अस्तित्वाला इराणपासून असलेला धोका दूर करणे हा होता. नेतन्याहू म्हणाले की, या ऑपरेशनचे लक्ष्य इराणच्या अणु पायाभूत सुविधा, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखाने आणि लष्करी क्षमतांवर हल्ला करणे आहे.

“आम्ही हे धोके पुढील पिढीसाठी सोडू शकत नाही,” असे नेतन्याहू म्हणाले, “कारण जर आपण आता कृती केली नाही, तर दुसरी पिढीच नसेल. जर आपण आता कृती केली नाही, तर आपण इथे असणार नाही.” इराणने सहा वर्षांत 20,000 क्षेपणास्त्रे तयार करण्याची योजना आखल्यामुळे, इस्रायल ती नष्ट करण्यासाठी काम करत आहे, असे नेतन्याहू यांनी ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ची माहिती देताना सांगितले.

इस्रायली लष्करानुसार, ही फक्त हल्ल्यांची पहिली पायरी होती. सुरुवातीच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या विविध भागांमधील अणु लक्ष्यांसह डझनभर लष्करी लक्ष्यांवर हल्ले समाविष्ट होते.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलचे राजदूत डॅनी डॅनॉन म्हणाले की, इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र पायाभूत सुविधांविरुद्ध सुरू केले आहे, ज्याचा उद्देश इस्रायलच्या नागरिकांसाठी आणि संपूर्ण जगासाठी असलेल्या तात्काळ आणि अस्तित्वाच्या धोक्याला दूर करणे आहे.

Web Title:
संबंधित बातम्या