छत्रपती संभाजीनगर – एमआयएमचे इम्तियाज जलील (aimim leader imtiaz jalee) यांचा बोलवता धनी कोण आहे, हे मला माहित आहे. योग्य वेळी मी पूर्ण ताकदीनिशी खुलासा करील असा टोला आज समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट (Minister sanjay shirsat) यांनी लगावला.
संजय शिरसाट यांनी पत्नी आणि मुलाच्या नावे शहाजापूरमधील सरकारी १० एकर जमीन फक्त १ कोटी १० लाख रुपयांना खरेदी केली. शेंद्रा एमआयडीसीमध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर सहा कोटी रुपयांची जमीन घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता.शिरसाट यांच्या गैरव्यवहारांची माहिती पुराव्यासह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांनी वेळ द्यावा अशी विनंती करणारे पत्र इम्तियाज जलील यांनी पाठविले आहे. दरम्यान शिरसाट यांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे जलील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना (ambadas danve) दिली आहेत.
शिरसाट यांच्यावर आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लक्ष्मण हिवराळे यांनीपोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून जलील यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यावर संजय शिरसाट म्हणाले की, उठावानंतर जे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांना अंगाव घेण्याचे काम हे मी केले. त्यामुळे महाविकास आघाडी मला टार्गेट करत आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याबाबत मला जास्त बोलायचे नाही.त्यांच्या मागे कोण आहे ? हे सर्व का होत आहे हे सर्व मला माहित आहे. मी योग्य वेळी उत्तर देईल. असे आरोप करणारे लोक जास्त काळ टीकत नसतात. इम्तियाज जलील यांचा बोलवता धनी कोण हे मला माहित आहे. मला थोडा वेळ द्या मी पूर्ण ताकदीनिशी खुलासा करेल.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








